मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आज रकुलप्रीतचा वाढदिवस आहे.
10 ऑक्टोबर 1990 साली नवी दिल्ली मध्ये ‘रकुलप्रीत सिंह’ जन्म झाला. रकुला आधीपासूनच कालक्षेत्राची आवड होती. 2009 प्रदर्शित झालेल्या “गिल्ली’ या कन्नड चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत आपले पाऊल टाकले.
View this post on Instagram
#dedepyaardetrailer launch !! ❤️ makeup by @im__sal styled by @tanghavri ,photography @trishasarang
रकुल सोशल मीडियावर जोरदार ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. काही वेळा तिचे फॅन्स तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव करतात असतात.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटच्या चौकशी मध्ये एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे रकुलप्रीत सिंह ची मुंबईत चौकशी करण्यात आली होती. यामध्ये रकुल बरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार होते.
View this post on Instagram