#HBD : खिलाडी ‘अक्षय’ कुमार

बॉलिवूडमधील ऍक्‍शन हिरो अर्थात 'अक्षय कुमार'चा आज वाढदिवस

मुंबई- बॉलिवूडमधील ऍक्‍शन हिरो अर्थात ‘अक्षय कुमार’चा आज वाढदिवस आहे. अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी पंजाब राज्यातील अमृतरसमध्ये एका पंजाबी कुटूंबामध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी अक्षय बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले. तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. तसेच त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्टही मिळवला आहे.

मिशन मंगल, हाऊसफुल, हेरा-फेरी, रुस्तम, पॅड मॅन आणि टॉयलेट एक प्रेम कथा अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून अक्षयने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. सध्या अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.