#HBD : “तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकून घेतलं सारं…’

आज अभिनेता सुशांतसिंग रजपूतचा जन्मदिन...

मुंबई – ‘सुशांत सिंह राजपूत’ हे नावं जेव्हा जेव्हा समोर येतं तेव्हा आजही अनेकांच्या मनाला त्याची अकाली एक्झिट चटका देऊन जाते. 14 जून 2020 ला सुशांतचा जीवनप्र्वास संपला. 21 जानेवारी 1986 रोजी पटणा, बिहार येथे त्याचा जन्म झाला. 

सुशांतने झी टीव्ही वाहिनीवरील पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सिनेसृष्टीमध्ये कोणताही गॉडफादर नसताना सुशांतने सिनेसृष्टीत आपले नाव कमावले. त्याचं सुरुवातीचं शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पाटणामध्ये झालं तर नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडेल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. 

पवित्र रिश्ता या मालिके नंतर, 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर अॅवार्ड फॉर बेस्ट मेल डेब्युटसाठी नामांकन मिळालं होत. सुशांतचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट जोरदार लोकप्रिय ठरले. 

त्यानंतर लॉकडाऊन मध्ये प्रदर्शित झालेला दिल बेचारा हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. सुशांत सिंह राजपुत याने 14 जून 2020 मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.