rajinikanth – मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांचा आज वाढदिवस आहे. रजनीकांत (rajinikanth) यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 बंगळूर येथे झाला. रजनीकांत (rajinikanth) यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात लहान.
रजनीकांत (rajinikanth) हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे. आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस म्हणजे तिथे एखादा उत्सव म्हणून साजरा केला होतो. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोखोंच्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग आहे.
https://t.co/8Fhuv4qZt8#LalSalaam @ash_rajinikanth @arrahman pic.twitter.com/I0sn73oniI
— Rajinikanth (@rajinikanth) November 12, 2023
टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत (rajinikanth) यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण 80-90 वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य
राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले. सुरवातीच्या 20-30 वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला. आणि रजनीकांत (rajinikanth) दाक्षिणात्य राज्यात स्थायिक झाले.
Rajnikanth Getting old like Wine!
He made our childhood awesome with his acting and actions!#Rajnikanth
#HBDSuperstarRajinikanth pic.twitter.com/CknbVJ5ON1— Saurabh Singh (@100rabhsingh781) December 12, 2023
रजनीकांत (rajinikanth) यांची स्टाईल, अभिनय, संवाद, टायमिंग याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे 150 हून अधिक चित्रपटात काम केले. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत (rajinikanth) बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होते.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘शिवाजी, द बॉस’ आणि ‘रोबोट’ या दोन्ही सिनेमांतून हिंदी चाहत्यांनीही रजनीकांत यांना डोक्यावर घेतले. आणि रजनीकांत (rajinikanth) हे केवळ साऊथचेच नाही तर संपूर्ण भारताचे आणि देशाचे सुपरस्टार असल्याचे शिक्कामोर्तब झाले.