मुंबई – अभिनेता कमल हसनचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 ला मद्रासमध्ये झाला. २ ऑगस्ट १९५९ ला चित्रपटगृहांत झळकलेल्या ‘कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी कमल हासन यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.
दरम्यान, ‘रागांगल’ या तमिळ चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेद्वारे तरुणपणी त्यांचा चित्रपटक्षेत्रात पुनःप्रवेश झाला. त्यांनी अभिनय केलेले मूंद्रम पिरै, नायगन, हे राम , विरुमांदी, दशावतारम्, चाची ४२० हे चित्रपट विशेष गाजले.
कमल हासनांच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या निघाल्या आहेत तर त्यांनी काही चित्रपट मूळ हिंदीमध्येच काढलेले आहेत. २०१३ सालापर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
View this post on Instagram
कमल हासन आणि श्रीदेवी यांचा ‘सदमा’ हा आयकॉनिक सिनेमा कुठलाच सिनेप्रेमी विसरू शकत नाही.
8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’ ‘मूंदरम पिरई’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटातील कमल हासन व श्रीदेवी यांच्या अभिनयाची जुगलबंदी इतकी अफलातून होती की, आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यातील ऐ जिंदगी, सुरमई अखियों में ही अजरामर गाणी तर आजही मनाचा ठाव घेतात.
कमल हासन यांचा ‘चाची 420 ‘ हा चित्रपट त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात तब्बू आणि फातिमाचीही महत्वाची भूमिका होती. यामध्ये फातिमाने भारती रतन या बालकलाकाराची भूमिका वठविली होती. तर कमल हासन यांनी वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती. ही चांगलीच लोकप्रिय ठरली होती.
#DarbarMotionPoster will be unveiled tomorrow by leading names… Kamal Haasan [#Tamil and #Telugu], Mohanlal [#Malayalam] and Salman Khan [#Hindi]… #Darbar stars Rajinikanth… Directed by AR Murugadoss… #Pongal2020 release. pic.twitter.com/p8TJmoHh0I
— taran adarsh (@taran_adarsh) November 6, 2019
दरम्यान, कमल हासन ‘दरबार’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. या चित्रपटतील कमल हासनचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.