#HBD : ‘ड्रीम गर्ल’चा आज वाढदिवस..!

बॉलिवूडची ड्रीम गर्ल, बसंती अर्थात “हेमा मालिनी’ आज 16 ऑक्‍टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करीत आहे. हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या हसतमुख सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने आपली एक वेगळी जागा बनवली आहे.

हेमा यांनी उण्यापु-या 14 व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यांच्या सौंदर्या आणि अदाकारीने अशी काही जादू केली की, पहिल्या चित्रपटानंतर त्यांच्याकडे दिग्दर्शकांची रांग लागली.

आज वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांच्यावर बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड सिलेब्रिटीजने सोशल मीडियावर हेमा यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर सध्या #HemaMalini ट्रेंड सुरू आहे.

दरम्यान, बॉलिवूड सिलेब्रिटी माधुरी दीक्षित यासारख्या अनेक कलाकारांसह त्यांच्या अनेक फॅन्सने सोशल मीडियावर खास अंदाजात अभिनंदन केले आहे.

वाढदिवसानिमित्त सध्या सोशल मीडियावर आज हेमा यांच्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध भूमिकांचे फोटो फॅन्सकडून शेअर करीत त्यांना खास अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.