#HBD: ‘बप्पी लहरी’ अंगावर इतकं सोन का घालतात माहितीये का? वजन व किंमत आहे…

मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण यापैकी काही कलाकार असेही आहेत जे ट्रेंड सेटर ठरले आहेत. अशाच ट्रेंड सेटरपैकी प्रसिद्ध एक नाव म्हणजे “बप्पी लहिरी…’

आज बप्पी लहिरी यांचा वाढदिवस आहे. 27 नोव्हेंबर 1952 मध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. 1973 मध्ये त्यांनी ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली. 1976 मध्ये आलेल्या विशाल-आनंद यांच्या ‘चलते-चलते’ चित्रपटातून बप्पी दा यांना ओळख मिळाली. बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला पार केला आहे.

500 पेक्षा जास्त गाणी त्यांनी कंपोज केलीत आणि स्वत:साठी एक लीजंड किताब मिळवला आहे. पॉप म्युझिकला बॉलिवूडचा एक महत्वाचा भाग बनवण्याचं श्रेय बप्पी लहरी यांना जातं. विषय 80 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांचा असो वा अलिकडे त्यांनी गायलेल्या गाण्याचा असो.

बप्पी लहिरी यांचं नाव नेहमी दोन गोष्टींशी जोडण्यात आलं आहे. एक गाण्यातील वेगळेपण आणि दुसरं सोनं… बप्पी दांचं सोन्याप्रति असलेलं प्रेम सर्वांनाच माहितेय. पण बप्पी लहिरी इतकं सोनं का घालतात? असा प्रश्न नेहमीच त्यांच्या फॅन्सला पडतो. दरम्यान, आपण इतकं सोन का घालतो याच सुद्धा उत्तर स्वतः बप्पी दांनं दिल आहे.

एका मुलाखतीत यावरून पडदा उठवला होता. बप्पी लहरी म्हणतात कि, “मला हॉलिवूड कलाकार एल्विस प्रेस्ली फार आवडत होता. मी पाहिलं होतं की, तो नेहमी एक सोन्याची चेन घालत होते. मी त्यांच्या या अंदाजाने इम्प्रेस झालो होतो. एल्विस प्रेस्लीला बघून मी ठरवलं होतं की, जास्त सक्सेसफुल बनून राहतील. त्यावेळी मी सोनं घालेल. असं ते म्हणाले होते. बप्पी लहरी सोन्याला त्यांच्यासाठी लकी मानतात.

दरम्यान, बप्पी दा यांच्या कडे किती सोन आहे आणि ज्वेलरीच वजन किती आहे असाही प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. बप्पी दा गळ्यात आणि हातात भारी भक्कम ज्वेलरी घालतातात. साल 2014 मध्ये लोकसभा निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपल्या संपत्ती विषयी माहिती दिली होती. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या माहिती नुसार बप्पी दा जवळ 754 ग्राम सोने आणि 4.62 किलो चांदी. कदाचित चालू काळात यात आणखी बदल झाला असेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.