#HBD : ‘सनी पाजी’चा आज वाढदिवस..!

मुंबई – बॉलिवूडचे सनी पाजी, अर्थात सनी देओल हा आज 19 ऑक्‍टोबर रोजी आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सनीने आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात आपल्या दमदार अभिनयाने केली असून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवली आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नेहमीच जादू केली आहे. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील डायलॉग आजही सिनेप्रेक्षकांना आवडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on


यानिमित्त सनी यांच्याकडे बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड सिलेब्रिटीजने सोशल मीडियावर सनी यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर सध्या #HappyBirthdaySunnyDeol  ट्रेंड सुरू आहे. तर काही फॅन्सने त्यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ट्विट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

अभिनेता सनी देओलचा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर-एक प्रेम कथा’ चित्रपट आठवतो का ? ‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ सारखे सुपरहिट डायलॉग्स असणारा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा डायलॉग असे ट्विट सनीच्या फॅन्सने त्याला शुभेच्छांचा दिल्या आहे.


दरम्यान, दामिनी,  गदर , घातक , बॉडर , जो बोले सो निहाल यांनसारख्या अनेक चित्रपटांमधील डायलॉगमुळे सनी आजही सनी आपल्या बॉलिवूड फॅन्सच्या मनात त्यांचे वेगळे स्थान आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)