#HBD: संकर्षण कऱ्हाडेच्या आयुष्य सोपं करणाऱ्या कविता नक्की ऐका

लेखक, अभिनेता आणि उत्कृष्ट निवेदक असणारा संकर्षण कऱ्हाडे कवीही आहे. त्याच्या कवितांना समाजमाध्यमांवर चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. सध्या टाळेबंदीत वाचन आणि लेखनात हरवून गेलेला संकर्षण लिहितो. त्याच्या वाढदिवसानिमित्त  आपण त्याच्या कवितांच्या दुनियेत जाणार आहोत.

 

प्रत्येकजण लिहीत असतो पण लोकांच्या मनातले लिहिता यायला हवे, ते जमले की लोक आपल्या लिखाणावर भरभरून प्रेम करतात. ‘गृहिणी’वर लिहिलेल्या कवितेला अगदी लंडनहून प्रतिसाद मिळाल्याचेही त्याने एका मुलाखतीत सांगितले.

 

जे घरबसल्या तुम्ही पाहताय, ते मी पण पाहतोय. आधी करोना आला, मग अम्फान वादळ आलं, मग आता निसर्ग आहे, तिकडे सीमेवर चीन बसलाच आहे. देशाच्या मागे या सगळ्या गोष्टी एकदम अशा का येतायत हे कळत नाहीये. पण हे सगळं घडत असताना मनात एक विचार सतत येतोय की ये राष्ट्र पुन: खडा होगा, असं तो  व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणतोय.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.