मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली ‘शेवंता’चं खर नाव अपूर्व नेमळेकर आहे. अपूर्व रोज रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंता बबून प्रेक्षकांच्या समोर येते.
आज अपूर्वाचा वाढदिवस आहे. अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ ला मुंबईच्या दादर येथे झाला. दादर भागातच ती लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून तिने दहावीपर्यंचे शिक्षण घेतलं असून, नॅशनल कॉलेज वांद्रे आणि त्यानंतर रुपारेल कॉलेज अशा दोन ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये अपूर्वाने साकारलेली शेवंता आणि अण्णा नाईक यांची लोव्हस्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
विराट कोहली हा आवडता क्रिकेटपटू, श्रेया घोषाल ही आवडती गायिका, शिल्पा शेट्टी आणि श्रीदेवी कपूर या अपूर्वाच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.
अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे.
अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील अपूर्वाने अभिनय केला आहे.