#HBD बॉलीवुडच्या ‘खलनायकाचा’ आज ५९वा वाढदिवस

बॉलीवुड स्टार, खलनायक संजय दत्त आज आपला ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्तला त्याचे चाहते ‘बाबा’ सुद्धा म्हणतात. संजय दत्तचा जन्म २९ जुलै १९५९ मध्ये झाला. त्यांनी ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलीवुड मध्ये एन्ट्री केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्यांची अभिनेता म्हणून सुरुवात चांगलीच गाजली. परंतु तो अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे तो अनेक वर्षे चित्रपट सृष्टीपासून दूर होता. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्याची तब्येत एकेकाळी फारच खालावली होती. त्यामुळे वडील सुनिल दत्त यांनी त्याला अमेरिकेत उपचारांसाठी नेले होते.

संजय दत्त जीवनात अनेक वाद झाले. त्यामुळे त्याला कारागृहात सुद्धा राहावे लागले. नुकताच संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपट सुद्धा आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)