मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे ‘अशोक सराफ’ यांचा आज म्हणेजच ४ जूनला वाढदिवस आहे. अशोक सराफ यांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘अशोक मामा’ म्हणून देखील ओळखले जाते.
अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ साली बेळगाव येथे झाला. पण त्यांचं बालपण दक्षिण मुंबईतल्या चिखलवाडीत गेलं आहे. आणि शालेय शिक्षण मुंबईतील डिजीटी विद्यालयात झाले आहे.
सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला.
अशोक सराफ यांनी १९६९ साली ‘जानकी’ या चित्रपटात भूमिका करून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
पांडू हवालदार’ , ‘कळत नकळत’, ‘भस्म’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’, ‘बनवाबनवी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. पत्नी निवेदिता सराफ आणि मुलगा अनिकेत असं अशोक सराफ यांच छोटं कुटुंब आहे.