मुंबई – हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनय, डायलॉग आणि सतरंगी डान्सने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते ‘अनिल कपूर’ यांचा वाढदिवस आहे. 24 डिसेंबर 1959 रोजी अनिल यांचा मुंबई जन्म झाला.
अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस याचं गणित अचूक जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो.
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आपल्या डायलॉग डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे असे अनेक डायलॉग्स आहेत, जे आजही लोकांच्या ओठी रेंगाळत असतात.
1979 मध्ये ‘हमारे तुम्हारे’ चित्रपटातून पदार्पण करणारे अनिल कपूर यांचा प्रवास आज सुध्दा त्याच गतीने पुढे गेलाय. ‘मशाल’, ‘तेजाब’, ‘बेटा (Beta)’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘जांबाज’, ‘दिल धड़कने दो’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
अनिल कूपूर यांना तीन मुले. त्यांमध्ये दोन मुली सोनम आणि रिया, मुलगा हर्षवर्धन आहे. सोनम बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आणि रिया निर्माती आहे. तसेच मुलगा बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.