मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणार महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणजेच अभिनेता “सुबोध भावे’ याचा आज वाढदिवस. आपल्या मराठमोळ्या खासशैली तसेच मार्मिक चित्रपटांमुळे सुबोध भावे नेहमीच सोशल माध्यमांमध्ये चर्चेत असतात.
View this post on Instagram
When you have your make-up artist always ready to capture U Thanks #sunny
‘अवंतिका’ या मालिकेतील नायिकेचा भाऊ साकारण्यापासून सुरु केलेली कारकीर्द आज सुपरस्टार पदापर्यंत पोचली आहे. अनेक यशस्वी मालिका, चित्रपट आणि नाटके आपली गाडी दिग्दर्शनाकडेही वळवली. मात्र सुबोधने एक सेल्समन म्हणूनही काम केलेले आहे? सुरवातीच्या काळात पोटासाठी तो एकीकडे अभिनय आणि एकीकडे सेल्समन अशा दोन जबाबदाऱ्या पार पाडायचा. सकाळी एका छोट्या आयटी फर्ममध्ये काम करणारा सुबोध रात्री नाटकाच्या तालमी करायचा.
मराठी बायोपिक आणि अभिनेता ‘सुबोध भावे’ यांचे एक समीकरण जुळले आहे. ‘लोकमान्य’, ‘बालगंधर्व’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’,’प्रल्हाद केशव अत्रे’ अशा अनेक बायोपिक गाजल्या आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ हा पहिलाच चित्रपट हिट करून आपलं नाणं खणखणीत वाजवलं. तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वीरीत्या कसं वावरायचं हे सुबोध कडून सगळ्या कलाकारांनी शिकण्यासारखं आहे.
सध्या आपल्या जोरदार बिन्दास्त ट्विटमुळे देखील सोशल माध्यमांच्या लाइमलाईट असतो. नुकतेच गाजलेले ट्विट म्हणजे सुबोध भावे याने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी पोस्ट केली होती.
View this post on Instagram
सुबोधने प्रेक्षकाबदल नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोन च्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल.”