#HBD लतादीदी : जाणून घ्या लतादीदींच्या अज्ञात गोष्टी 

भारतरत्नाने सन्मानित स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाचे आज संपूर्ण जगभर चाहते आहेत. स्वरांची राणी लता मंगेशकर यांचा आज ८९ वा वाढदिवस आहे. आठ दशकापासून आपल्या आवाजाची जादू कायम ठेवणाऱ्या लता मंगेशकर यांनी ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गेली आहेत. तर लतादीदी अशा एकमेव व्यक्ती आहे. ज्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो.

लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशच्या इंदौर शहरात एका मध्यमवर्गीय घरात झाला. परंतु, त्यांचे बालपण मुंबईत गेले. लता हे त्यांचे खरे नाव नसून हेमा आहे. तसेच त्यांचे आडनाव मंगेशकरही नसून हर्डीकर आहे. परंतु, त्यांनी आपले गाव मंगेशी (गोवा)च्या नावावर आपले आडनाव ठेवले. लतादीदींचे वडील नाटकामध्ये कलाकार आणि गायक होते. लहानपणापासूनच लतादीदींना गायिका होण्याची इच्छा होती. परंतु, वडिल शास्त्रीय गाण्याचे प्रशंसक असल्याने लतादीदींच्या गाण्याला विरोध होता. १९४२ त्यांच्या वडिलांचे निधन झाले. व कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लतादीदींवर येऊन पडली. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लतादीदींना स्टेजवर गाण्यासाठी पहिल्यांदा २५ रुपये मिळाले. लतादीदींनी पहिल्यांदा ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी गाणे गायले. त्यांच्या भावंडानीही गायन क्षेत्रालाच करिअर म्हणून निवडले. १९४८ साली सुधाकर मुखर्जी यांनी शाहिद चित्रपटात लतादीदींना गाण्याची संधी देण्यास नकार दिला. १९४९ साली ‘महल’ या चित्रपटात ‘आएगा आने वाला’ या गाण्यांनी त्यांना ओळख मिळवून दिली. आणि स्वरकोकिळा बनल्या. लतादीदींनी अनेक चित्रपटांना आपला आवाज देऊन अजरामर बनविले आहे.

…म्हणून लतादीदींनी केला नाही विवाह 
लहानपणी लतादीदी कुंदनलाल सेहगल यांच्या चाहत्या होत्या. मोठे झाल्यावर त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा दीदींची होती. परंतु, कुटुंबाची संपूनज बाबदारी त्यांच्यावर असल्याने इच्छा पूर्ण झाली  नाही.

२००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

दै. प्रभातकडून लतादीदींना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)