#HBD प्रीती झिंटा :  ३४ मुलींची आई आहे प्रीती

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आज ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या प्रीतीचे बालपण अत्यंत खडतर परिस्थित गेले. केवळ १३ वर्षाची असताना प्रीतीचे वडील एका कार अपघातात मृत्यू पावले. दोन वर्षांनी प्रीतीची आईही जग सोडून निघून गेली. दिल्लीत आल्यावर प्रीतीला अनेक वेळा छेडछाडीला सामोरे जावे लागले.

प्रीती झिंटाने आपल्या करिअरची सुरुवात एका अॅड फिल्मने केली होती. शाहरुख खानचा ‘दिल से’ चित्रपटातून प्रीतीने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर वीर-जारा, कल हो ना हो, कोई मिल गया, कभी अलविदा ना कहना,चोरी चोरी चुपके चुपके, ये रास्ते हैं प्यार के, दिल चाहता है, मिशन कश्मीर, हर दिल जो प्यार करेगा यासारखे हिट चित्रपट तिने दिले आहेत. २०१६ साली प्रीतीने लॉस एंजिलिस येथे बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत गुपचुप लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे. प्रीती झिंटा आयपीएलचा किंग्स इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याव्यतिरिक्त प्रीती झिंटा ३४ मुलींची आई आहे. म्हणजेच २००९ साली प्रितीने ऋषिकेशमधील अनाथाश्रम मदर मिरॅकलमधून ३४ मुलींना दत्तक घेतले होते. या मुलींच्या शिक्षणाचा खर्च ती करत आहे. नुकताच प्रीतीचा ‘भैय्याजी सुपरहिट’ चित्रपट प्रदर्शित झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)