# HBD जवागल श्रीनाथ – भारतीय जलदगती गोलंदाजीतील ‘हीरा’

भारतीय सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांमध्ये ज्याचे नाव आघाडीलाच घ्यावे लागेल अश्या जवागल श्रीनाथ यांचा आज जन्मदिवस. कपील देवनंतरच्या काळात भारतीय संघातीलप्रमुख जलदगती गोलंदाज म्हणून जवागल श्रीनाथ यांच्याकडे पहिले जाते. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. चेंडूला स्विंग करण्याचे मोठे कसब त्यांच्याकडे होते.

आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भारताला विजय मिळवून दिले. परंतु साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या २००१च्या मालिकेत पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये त्यांनी  ७६/६ बळी घेतले होते आणि ती कसोटी जिंकून भारताला मालिकेत पुनरागमन करण्यात मोठी मदत केली होती. तो सामना त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम सामना ठरावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या गोलंदाजीच्या शैलीत त्यांनी फलंदाजाला समजू नये  काही बदल केले होते. ते गोलंदाजी करण्यास धावत येत असताना फलंदाजाला आपल्या हातातील चेंडू दिसणार नाहीयाची जबादारी घेत असत.  त्यामुळे आपण इन स्विंग करणार की आऊट स्विंग करणार हे फलंदाजाला समजू नये आणि त्याचा चेंडूंविषयीचा पूर्वग्रह चुकीचा ठरावा.   तो चुकीचा फटका खेळावा आणि बाद व्हावा असा त्यांचा हेतू असायचा. भारताचा माजी गोलंदाज झहीर खान हा देखील  जवागल श्रीनाथ यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन त्याच्या गोलंदाजी शैलीत बदल केले होते.  जे दोन्ही स्विंग गोलंदाजांची फायद्याचे ठरले होते.

विश्वचषक १९१९६ मधील श्रीलंके विरुद्धचे पहिले षटक देखील अनेकांच्या स्मरणात असेल.  अश्या अनेक उत्तम कामगिरीमुळे जवागल श्रीनाथ यांना  क्रिकेटमध्ये वेगळे स्थान आहे. त्यांनी ६७ कसोटी सामन्यात २३६ बळी  मिळवले तर २२९ एकदिवसीय सामन्यात ३१५ बळी मिळवलेले आहेत.  भारताच्या या महान गोलंदाजाने आपला शेवटचा सामना २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला आणि त्यानंतर निवृत्ती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)