भीमाशंकर मंदिरावर धुक्‍याच्या दुलई

मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. मंदिर परिसरही धुक्‍याच्या दुलईत हरवलेले असून, सध्या मंदिराच्या चोहो बाजूंनी वृक्षांची गर्दी, धुक्‍याचे फोटो घेताना अनेक पर्यटक दिसत आहेत.

श्रावण महिना सुरू होण्यासाठी जेमतेम चार दिवस बाकी आहेत. गुरुवारपासून (दि. 1) श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून प्रशासनाने दर्शनरांगेची व्यवस्था केली आहे. प्रसाद, बेल, फुले, पेढे, नारळ, तुळशी, पान इत्यादी वस्तूंनी दुकाने खचाखच भरली आहेत.

येथे पडणाऱ्या मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दोन दिवसांपासून श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने मंदिर परिसर धुक्‍याच्या दुलईत हरवला आहे. भाविक आणि पर्यटकही पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.