कोव्हिड-19 चा धोका अजूनही कायम आहे आणि स्पर्धा सुरू झाल्यापासून खेळाडू सतत संक्रमित होत आहेत. त्यातच रियल माद्रिद संघाचा एडेन हेजार्ड आणि मिडफिल्डर कासेमिरो यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
स्पेनच्या या आघाडीच्या क्लबने म्हटले आहे की, त्यांच्या संघाच्या अन्य सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांची शुक्रवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच कोरोना व्हायरस संबंधी सर्व नियमानुसार 29 वर्षीय हेजार्ड आणि 28 वर्षीय कासेमिरो यांना विलगीकरणात रहावे लागेल.
दरम्यान, रियल माद्रिदचा येत्या रविवारी वेलेंसिया संघाशी सामना होणार आहे.तसेच हेजार्डला आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी बेल्जियम संघात देखील सामिल करण्यात आले आहे, पण याक्षणी तरी हेजार्डला कोरोना संसर्गावर मात करावी लागेल.