हवाहवाई गर्ल…

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांची जयंती आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.

श्रीदेवींचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. थुनीवावन हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका त्यांनी साकारली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये ‘हिम्मतवाला’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. त्यानंतर त्यांचे एकापाठोपाठ एक चित्रपट हिट होत राहिले आणि त्या प्रसिद्धीच्या एका उंचीवर जाऊन पोहचल्या.

1996 मध्ये निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्‍लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले, गैर क़ानूनी, चालबाज, खुदा गवाह,  लम्हे, हीर रॉंझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चॉंद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल,

इंग्लिश विंग्लिश अशा उत्कृष्ट सिनेमातून त्यांनी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशा या हरहुन्नरी, अष्टपैलू अभिनेत्रीची आज जयंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)