संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आज नवीन 61 कोरोना पॉझिटिव्ह
सांगली (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिसून येऊ लागलेला आहे. गेल्या तीन दिवसात परिस्थिती अत्यंत चिंताजनक झालेली असून आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नवीन 61 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या 902 पोहोचली आहे.
कोरोनामुळे सांगली जिल्ह्यातील परिस्थिती गेल्या तीन दिवसात अत्यंत चिंताजनक होऊ लागलेली आहे .जिल्ह्यात आज उपचारा खाली 449 रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आज अखेर बरे झालेली रुग्णसंख्या 433 इतकी झाली आहे . जिल्ह्यातील 26 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 24 रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आज जिल्ह्यातील 13 रुग्ण मात्र कोरोनामुक्त ही झालेले आहेत.
आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 573 असून ,आज अखेरची शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 75 आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील आजची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 254 वर पोहोचली.
तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी 79, जत 106 ,कडेगाव 46, कवठेमहांकाळ 25, खानापूर 27 ,मिरज 59 , पलूस 58, शिराळा 147, तासगाव 26, वाळवा 75 ,मनपा 254 अशी झालेली आहे.
शिराळा ,आटपाडी ,जत , वाळवा रुग्णसंख्या आता अग्र क्रमांकावर आलेली आहे. त्या खालोखाल महानगरपालिका क्षेत्रही त्यामध्ये समाविष्ट होऊ लागलेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मात्र गेल्या तीन दिवसात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.