“जगभर फिरून केले HUG, देशासाठी मात्र ठरले ठग” : राष्ट्रवादीच्या मोदींना कोपरखळ्या

जगभरामध्ये सध्या मोठ्या उत्साहामध्ये व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारीपासून १४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या ‘व्हॅलेंटाईन वीक’ मध्ये प्रेमी जोडपी एकमेकांप्रतीचे आपले प्रेम व्यक्त करत असतात. याच व्हॅलेंटाईन वीक मध्ये आजचा दिवस हग-डे म्हणून साजरा केला जातो, या दिवशी आपल्या प्रियजनांना प्रेमाने मिठी मारण्याची परंपरा आहे.

दरम्यान, आजच्या हग-डे निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना चांगल्याच कोपरखळ्या मारण्यात आल्या आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला मोदीजी जगभरातील बड्या नेत्यांना आलिंगन देताना दिसत आहेत मात्र यानंतर या व्हिडिओवर नोटबंदी, जीएसटी, काळा पैसा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार अशी अक्षरे उमटत असून शेवटी “जगभर फिरून केले HUG, देशासाठी मात्र ठरले ठग” असा संदेश देत ‘हग-डे’च्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.