मुंबई – अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ ही बॉलीवूडमधील सर्वाधिक व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. सोशल मीडियावर तापसीचा मोठा चाहता वर्ग असून, फॅन्स तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.
अभिनयाप्रमाणेच तापसी तिच्या ग्लॅमर्स लूकसाठी देखील प्रसिद्ध असते. ग्लॅमरस रूपात झळकत असलेल्या तापसीने आपले काही फोटो आता इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तिने साडीवर एक अतिशय सुंदर व लांबलचक कोट परिधान केला होता.
View this post on Instagram
साडी आणि कोट हे कॉम्बिनेशन अनेकांना पसंत पडले आणि आता तिचे हे फोटो चांगलेच व्हायरलही झाले आहेत. या लूकमध्ये तापसी प्रचंड सुंदर आणि देखणी दिसत आहे.
चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. तापसीचा नुकताच म्हणजेच 1 एप्रिलला ‘मिशन इम्पॉसिबल’ हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची देखील सर्वत्र चर्चा आहे.