कंगनाचा ‘तेजस’ लूक पाहिलात काय?

कंगणाच्या प्रत्येक रोलमधील गेटअप अगदी लक्षवेधी असतो. “मणिकर्णिका’ आणि “पंगा’ प्रमाणेच “तेजस’ या आगामी सिनेमातील तिचा गेटअपदेखील असाच लक्षवेधी असणार आहे. “तेजस’मध्ये कंगणा फायटर पायलटच्या रोलमध्ये असणार आहे. त्याच वायुदलाच्या युनिफॉर्ममधील तिचा फर्स्ट लुक सोमवारी रिलीज झाला.

तेजस या लढाऊ विमानाच्या समोर कंगणा उभी आहे. एअरफोर्सचा युनिफॉर्म, डोळ्यांवर सनग्लासेस, हातात हेल्मेट घेतलेली कंगणा खरोखर एखाद्या फायटर पायलट म्हणून शोभून दिसते आहे. तेजस या फायटर जेटमधून देशात 2016 साली प्रथमच लढाऊ वैमानिक म्हणून महिलांना प्रवेश मिळाला आहे.

त्याच ऐतिहासिक घडामोडींवर “तेजस’ची कथा आधारलेली आहे. अनेकवेळा सुरक्षा दलांमधील महिलांनी केलेल्या त्याग आणि शौर्याची म्हणावी तेवढी दखल घेतली जात नाही. आता फायटर पायलट बनण्याचा मान मिळालेल्या पहिल्या महिलेचा रोल आपल्याला मिळाल्याबद्दल कंगणा स्वतःला भाग्यवान समजते आहे.


नवोदित लेखक – दिग्दर्शक सर्वेश मेवारावर या सिनेमाची जबाबदारी आहे. देशातील महिलांच्या दृष्टीने गौरवाच्या या घटनेवर प्रकाश टाकणाऱ्या या सिनेमाचे शूटिंग या उन्हाळ्यामध्ये होणार आहे आणि पुढच्या वर्षी एप्रिलच्या सुमारास “तेजस’ रिलीज होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.