मुंबई – “बाहुबली’मुळे यशोशिखरावर पोहोचलेल्या अभिनेता प्रभासच्या आगामी “साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे.
या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे मिळालेल्या माहितीनुसार, या आयटम साँगसाठी जॅकलीनने 2 कोटी आकारले आहे. दरम्यान, “साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.