मुंबई – पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती.
पुन्हा एकदा रानू मंडल यांनी गाण्याची रेकॉर्डिंग केली आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्या बंगली भाषेतील दुर्गापूजेचं गाणं गाताना दिसत आहे. कोलकातामधील दुर्गा पूजेच्या निमित्तानं रानू यांनी एक बंगाली गाणं रेकॉर्ड केलं. त्याच्या या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रानू यांचं हे गाणं त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदर रेकॉर्ड केलं होतं असं बोललं जातं. त्यानंतर त्यांनी मुंबईतून परत्यानंतर त्यांनी या गाण्याला फायनल टच दिला आहे. हे बंगाली दुर्गा पूजा थीमचं गाणं प्रीतम डे यांनी लिहिलं आहे.