मुंबई – करोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये आता पर्यंत अनेक भाजप नेत्यांनी कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे अजब गजब दावे केले आहे. तर यातच आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी असाच अजब दावा केला आहे.
World Environment Day is celebrated on June 5. The world is facing pandemic, & environmental impacts can be seen. At this time, not only on June 5 but every other day till we defeat COVID, I request all ‘Brijwasis’ to perform havan at home with their families: BJP MP Hema Malini pic.twitter.com/VMGKwZqx05
— ANI UP (@ANINewsUP) June 4, 2021
करोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे हेमा मालिनी यांचे म्हणणे आहे. त्यांनी होमहवन केल्याची बातमी काही वाहिन्यांनी दिली.
World Environment Day is celebrated on June 5. The world is facing pandemic, & environmental impacts can be seen. At this time, not only on June 5 but every other day till we defeat COVID, I request all ‘Brijwasis’ to perform havan at home with their families: BJP MP Hema Malini pic.twitter.com/VMGKwZqx05
— ANI UP (@ANINewsUP) June 4, 2021
वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच देशभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याच दरम्यान हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले की.’भारतात करोना आजार आल्यापासून मी नियमितपणे धूप घालून हवन करते आहे.’
त्या पुढे म्हणाल्या,’मी हवन करण्यासाठी तूप, नीमची पाने आणि लोबान यांचा समावेश करते. या हवनमुळे घरातील वातावरण पवित्र होत असून घरात गृहक्लेशही होत नाही. लोबान आणि अन्य सामग्रीमुळे आजार रोखण्यास मदत होते. मी रोज हवन करते, तुम्हीही करा.’ असे हेमा मालिनी यांनी म्हटले असून हवन कसे करावे याबाबत माहिती दिली.