हौसेला मोल नाही! कोरोनावर मात करण्यासाठी ‘या’ पठ्ठ्याने बनवला सोन्याचा मास्क

पुणे – कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर फेस मास्क घालणं आवश्यक झालं आहे. मास्क न घातल्यास दंड भरावा लागू शकतो.

अशातच आता पुण्यातील एका अवलियाने लाखो रुपये खर्च करून सोन्याचा मास्क तयार केला आहे. एकीकडे सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढत होत चालली असताना, अशाप्रकारे सोन्याचा मास्क बनवल्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

शंकर कुराडे असं या व्यक्तीच नाव असून, ते पिंपरी-चिंचवड येथे राहणारे आहेत. शंकर कुराडे हे हा सोन्याचा मास्क घालून बाहेर फिरतात. हा मास्क साडेपाच तोळ्यांचा असून, याची किंमत 2.89 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा देशातील सर्वात महागडा मास्क असण्याची देखील शक्यता आहे.

मात्र, या गोल्डन मास्कमुळे संसर्गापासून संरक्षण होणार का? या सोन्याच्या मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो का? असे अनेक प्रश्नदेखील अनेकांकडून विचारले जात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.