काँग्रेस बाबतचा जनतेच्या मनातील आक्रोश मावळला: चंद्रबाबू नायडू 

अमरावती: आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपेने याच वर्षाच्या सुरुवातीला भाजपासोबत काडीमोड घेतला आहे. अशातच टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस बाबतचा जनतेच्या मनातील आक्रोश मावळला आहे असे वक्तव्य केल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

टेलेकॉन्फरन्स द्वारे पक्षाच्या खासदारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी  “काल आंध्र प्रदेश पुनर्ररचना अधिनियमाबाबत राज्यसभेमध्ये काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे, राज्यातील जनतेमध्ये काँग्रेस बद्दल असलेला आक्रोश मावळला आहे. तर याउलट भाजपाच्या गर्विष्ठ नेत्यांनी केलेल्या विश्वासघातामुळे त्यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष ओढवून घेतला आहे” असे वक्तव्य केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)