हाथरस – हाथरस येथील दलित कुटुंबातील मुलीवर सामुहिक बलात्कार व तिची हत्या करण्याचो जो प्रकार घडला आहे आणि त्या विषयी सरकारकडून जे वेगवेगळे दावे केले जात आहेत.
त्या संबंधात प्रत्यक्ष पीडित मुलीच्या कुटुंबियांची बाजू ऐकून घेण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या कुटुंबियांनाआज कोर्टापुढे पाचारण केले आहे. त्यानुसार हे कुटुंबिय कडक पोलिस बंदोबस्तात कोर्टापुढे हजर राहून आपली बाजू मांडणार आहेत.
गेल्या 1 ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने मुलीच्या मातापित्यांना कोर्टापुढे हजर राहून निर्भीडपणे त्यांची बाजू मांडण्याची सुचना केली आहे. त्यांना हायकोर्टात घेऊन येऊन पुन्हा घरी नेऊन सोडण्याचा आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिला आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांनी या पीडित कुटुंबियांच्या घराभोवती कडक पहारा बसवला आहे. तेथे दिवसरात्र 60 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून घराभोवती आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कुटुंबियांच्या घरी येजा करणाऱ्यांचीही नोंद पोलिस करीत आहेत.
आज राज्याचे अतिरीक्त मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अतिरीक्त पोलिस महासंचालक यांनाही कोर्टापुढे येऊन या घटनेच्या संबंधात माहिती देण्याची सुचना हायकोर्टाने केली आहे.