लखनौ – उत्तर प्रदेशमधील सर्व स्त्रियांच्या सन्मान आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की, भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिले जाईल. तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे, असे ट्विट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक प्रकारानंतर देशभरातून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. अशातच आता योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे या प्रकरणावर भाष्य केले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले की, यूपीमधील महिलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱ्यांचा संपूर्ण नाश अपरिहार्य आहे. त्यांना अशी शिक्षा मिळेल, जी भविष्यात उदाहरण म्हणून देण्यात येईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आणि वचनही असल्याचे त्यांनी सांगितले.