मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतने आज उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर भूमिका मांडताना आपला मुख्यमंत्री योगींवर अफाट विश्वास असल्याचे म्हंटले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडीत महिलेचा काल दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पीडितेच्या मृत्यूनंतर तिचे शव परिवाराकडे सुपूर्द न करता उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर दहन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पीडीतेचा मृत्यू आणि त्यानंतर प्रशासनाने दाखवलेली मुजोरी यांमुळे संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भूमिका मांडताना अभिनेत्री कंगना रानौतने आपला मुख्यमंत्री योगींवर अफाट विश्वास असल्याचे म्हंटले आहे. कंगनाने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये, “माझा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अफाट विश्वास आहे. ज्या प्रकारे प्रियंका रेड्डीच्या बलात्काऱ्यांना त्यांनी कुकर्म केलेल्या जागेवरच गोळ्या घालण्यात आल्या, अगदी तसाच भावनिक, सहज आणि आवेगपूर्ण न्याय आम्हाला याप्रकरणी हवा आहे.” अशी मागणी केली आहे.
I have immense faith in @myogiadityanath ji, just how Priyanka Reddy rapists were shot dead on the very spot they raped and burnt her alive we want the same emotional, instinctive and impulsive justice for #HathrasHorror #HathrasHorrorShocksIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 30, 2020
कंगनाच्या या भूमिकेबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून जर ही घटना महाराष्ट्रात घडली असती तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस? असा प्रश्न विचारला आहे. एका ट्विटर युजरने महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांसारखी वर्तणूक कधीच केली नसती असं म्हणत उत्तर प्रदेशातच मोघलाई सरकार असल्याची टीका केली आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा