हाथरस, बलरामपूरच्या घटना दुर्दैवी – उद्धव ठाकरे

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे महिलांवर झालेल्या बलात्काराच्या घटना दुर्दैवी आहेत.

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेने पाहिले तरीही सहन होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला म्हणायचे की दरारा आणि दहशत. पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुंडांची असते ती दहशत.

दहशत मोडून काढा, गुंडगिरी सुरु असेल तर ही दहशत मोडून काढली पाहिजे. या गुंडांसाठी पोलिसांचा दरारा पाहिजे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.