नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरुवारी लिटरमागे पेट्रोलच्या दरात 25 पैशांची, तर डीझेलच्या दरात 30 पैशांची वाढ केली. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरवाढीची हॅट्ट्रिक झाली. सलग तीन दिवसांत मिळून पेट्रोल 59 पैशांनी, तर डीझेल 69 पैशांनी महागले.
सार्वजनिक कंपन्या इंधन दरांचा दैनंदिन आढावा घेतात. त्यानुसार, पेट्रोल आणि डीझेलचे दर कमी-जास्त होतात किंवा “जैसे थे’ राहतात. दैनंदिन आढाव्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच्या मोठ्या दरवाढीत ताज्या दरवाढीचा समावेश झाला आहे. मागील वर्षाच्या मार्चपासून पेट्रोल तब्बल 21 रुपये 58 पैशांनी, तर डीझेल 19 रुपये 18 पैशांनी महागले.