नवी दिल्ली – करोना संसर्गामुळे चित्रपटगृह अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे अनेक कलाकार आणि चित्रपट निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करत आहेत. यामध्ये वेबसिरीज अधिक प्रमाणात आहेत. आता अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील नेटफ्लिक्सवर एंट्री केली आहे.
तापसीचा हसीन दिलरुबा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात तापसीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं ट्रेलस सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटात तापसी पन्नू शिवाय विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेमाचा त्रिकोण देखील पाहायला मिळणार आहे. तापसी आणि विक्रांत पती-पत्नीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या २ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
तापसीच्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हे ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.