मुंबई – काही दिवसांपूर्वी (11 जानेवारी) राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. अश्यातच, काल (11 मार्च) पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडीने दुसऱ्यांदा धाड मारल्याने मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.
काल पहाटेच ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड मारली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन छाननी केली आहे. यावेळी ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यातील ईडीने ही दुसरी छापेमारी केल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला असून, सगळीकडे एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.
काल दिवसभरात आमदार मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास छापेमारी केली असून, यावेळी त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. या चौकीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. मुश्रीफ यांना उद्या म्हणजेच, सोमवारी 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.