ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्वास्थ्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती

कोल्हापूर -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी कागल कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती झाली. कागल नगरपरिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांच्या हस्ते झालेल्या या आरतीमध्ये कोरोना ग्रस्तांसह कार्यकर्त्यांनीही विघ्नहर्त्याला साकडे घातले.

यावेळी पक्ष प्रतोद नितीन दिंडे, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित शिंदे, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ व  उपचार सुरू असलेले कोरोनाग्रस्त रुग्णही उपस्थित होते

यावेळी बोलताना पक्षप्रतोद नितीन दिंडे म्हणाले, हे विघ्नहर्त्या गणराया……. ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ  म्हणजे गोरगरिबांचा पाठीराखा. त्यांना या महामारीच्या संसर्गापासून लवकरात
कोरोनाग्रस्त म्हणून उपचार सुरू असलेले व्हन्नुरचे दिपक सदानंद यादव म्हणाले, आमच्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच देव व तेच विघ्नहर्ता आहेत.

कारण, बाहेर दवाखान्यांमध्ये दोन – दोन, तीन- तीन लाख घेऊन कोरोनाग्रस्तांची लूट सुरू असताना आम्ही मात्र येथे मोफत उपचार घेत आहोत. सर्व सुविधांनी युक्त या केंद्रात आम्हाला जेवण ही घरच्यासारखे मिळत आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणूनच येथे आनंदाने जगत आहोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.