करोना काळापासून योग्य धडे घेतले का? – उपराष्ट्रपती

स्वयं-मूल्यांकनासाठी सुचवली 10 मुद्द्यांची सारणी

नवी दिल्ली: करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळातील जीवनावर आत्मनिरीक्षण करण्याचे आणि या सगळ्यापासून काही योग्य धडे शिकलो आहोत की नाही, याचे मूल्यांकन करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले आहे.

कोविड-19 साठीचे आजार होण्याची कारणे आणि त्याचे परिणाम याविषयी लोकांशी संपर्क साधण्यासाठी नायडू यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, करोना काळातील जीवनावर चिंतन.

संभाषणात्मक पद्धतीने लिहिताना, त्यांनी 10 प्रश्‍न विचारले आहेत आणि त्या प्रश्‍नांची उत्तरे गेल्या चार महिन्यांतील टाळेबंदीच्या काळात आपण काय शिकलो याचे मूल्यांकन करण्यात आणि जीवनातील मागण्यांमध्ये काय बदल घडले, हे समजण्यास मदत करतील. भविष्यात अशा कोणत्याही दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लोकांनी समजूतदारपणे स्वतःला सुसज्ज केले आहे का हे जाणून घेण्यासाठी ही 10 मुद्यांची सारणी लोकांना मदत करेल, असे नायडू म्हणाले.

साथीच्या आजाराकडे केवळ एक “आपत्ती’ म्हणून न पाहता जीवनशैलीमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणणारा एक “सुधारक’ म्हणून पाहणे आवश्‍यक आहे. आपण निसर्ग व संस्कृतीसोबत एकोप्याने राहू शकू.

आयुष्याच्या सर्व अभिव्यक्‍त यांमधील आणि संदर्भाच्या संपूर्णतेचे निरंतर मूल्यमापन उत्तम आयुष्यासाठी अत्यावश्‍यक आहे. आपण सध्या कोरोना विषाणूसह जगत असल्यामुळे अशीच एक संधी आपल्याला सध्या उपलब्ध झाली आहे, असे उपराष्ट्रपतींनी जोर देऊन सांगितले.

आधुनिक जीवनशैलीचे कार्य, स्वरूप आणि वेग यावर पुनर्विचार करण्यासाठी तसेच सामंजस्यपूर्ण व संतुलित जीवनासाठीच्या योग्य बदलांव्यतिरिक्त जीवनाचा हेतू योग्य पद्धतीने परिभाषित करण्यासाठी नायडूंनी ‘करोना काळातील जीवनावर चिंतन’ करण्यावर भर दिला आहे.


पृथ्वीवर मालकी हक्‍क नको…!

निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्या भोजनाकडे औषध म्हणून पाहावे. भौतिक प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन जीवनाला आध्यात्मिक परिमाण प्राप्त करून द्यावेत. योग्य तत्त्वे आणि पद्धती समजून त्यांचे पालन करावे. इतरांची काळजी घेणे. सामाजिक बंधन पाळणे याचा समावेश आहे.

पृथ्वीला आपली गरज नाही. तर आपल्याला या पृथ्वीची गरज आहे. पृथ्वीला केवळ मनुष्याची संपत्ती असल्याप्रमाणे मालकी हक्‍क असल्यासारखे वर्तन केले जात आहे. यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडले आणि बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत, असेही नायडू म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.