यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकापेक्षा एक बॉलिवूड अभिनेत्रींचे पदार्पण पाहायला मिळत आहे. सारा अली खान, मानुषी छिल्लर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरियाणवी सिंगर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीने देखील कान्स फिल्म फेस्टिव्हला हजेरी लावली.
७६व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर सपना चौधरीचा साधा आणि स्टनिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सपनाने तिच्या स्टनिंग आणि सिंपल लूकचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
सपनाने आता इंस्टाग्राम अकाऊंटवर कान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओमध्ये दिसते आहे की रेड कार्पेटवर हजारो फोटोग्राफर उपस्थित आहेत, आणि सपना आपल्या हटके अंदाजात पोज देत आहे.
सपना चौधरीच्या लूकबद्दल सांगायचे तर,’तिने या फेस्टिव्हलसाठी सॉफ्ट पिंक गाऊन निवडला. फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि उंच नेक असलेल्या या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. फुल स्लीव्हज आणि बॉडी फिटिंग असलेल्या या गाऊनमध्ये गुलाबी फुलांची नक्षी आहे. सपनाने हा गाऊन कमीतकमी लूकमध्ये कॅरी केला आहे, या सुंदर दिसणाऱ्या गाऊनचे वजन ३० किलो आहे.’
सपनाला खरी लोकप्रियता तिच्या डान्स आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून मिळाली. बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर सपनाची लोकप्रियता गगनाला भिडली. यानंतर सपनाने अनेक हिट देसी गाणी दिली, जी थेट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.