हरियाणामध्येही लवकरच “लव्ह जिहाद’ कायदा

फरीदाबाद – उत्तर प्रदेशनंतर आता हरियाणातही लव्ह जिहाद विरोधात लवकरच कायदा येणार आहे. याबाबत हरियाणचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत: ट्‌विटद्वारे माहिती दिली आहे. फरीदाबादच्या वल्लभगड येथे झालेल्या निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल विज यांनी ट्‌वटि करत, हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यावर विचार सुरू आहे, असे सांगितले.

फरीदाबाद हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने यापूर्वीच घेतलेला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असे देखील त्यांनी ट्‌विट केले होते. 

अनिल विज यांच्यामते वल्लभगड प्रकरणाचा तपास एसआयटी आता 2018 पासून करेल. जलगती न्यायालयात दररोज याप्रकरणी सुनावणी केली जाईल. या प्रकरणातील दोषींना दया-माया दाखवली जाणार नसल्याचे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या “लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची अत्यंत गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून आले. अलहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत, लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी जाहीर सभेत सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.