अहमदाबाद – विकास खंडोला, विकास काळे आणि विनयच्या कामगिरीच्या बळावर हरयाणा स्टिलर्सने बंगळुरू बुल्सचा 33 विरुद्ध 30 गुणांनी संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच नोंदवली.
आजच्या सामन्यातील विजयाने हरयाणाने सहा सामन्यात तीन विजय आणि तीन पराभवांसह क्रमवारीत नववे स्थान पटकावले. तर, पराभवामुळे बंगळुरूला पहिल्या स्थानी पोहोचण्यात अपयश आले. आता ते क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
सामन्यात बंगळुरूच्या संघाने 17 रेड पॉइंट्स मिळवले तर हरयाणाने 18 रेड पॉइंट्स मिळवले. तसेच हरयाणाने 12 टॅकल पॉइंट्स मिळवले. तर, बंगळुरूला केवळ 9 टॅकल पॉइंट्स मिळवता आले. तर, दोन्ही संघांना प्रत्येकी 2 ऑल आऊट पॉइंट्स मिळाले. यावेळी हरयाणाच्या विकास खंडोलाने सर्वाधीक 12 गुण केले. तर, विकास काळेने 6 आणि विनयने 5 गुण करत त्याला सुरेख साथ दिली. तर, बंगळुरूच्या संघाकडून रोहित कुमारने 12, पवन कुमारने 7 आणि मोहित सेहरावतने 2 गुण करत चमकदार कामगिरी केली.