नवी दिल्ली – वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कधी नोकरी केली आहे का? त्यांनी शिक्षण किती घेतले आहे? असे अनेक प्रश्न आहेत, जे त्याच्या चाहत्यांच्या तसेच इतरांच्याही मनात घर करत असतात. दरम्यान, राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
Harvard से Cambridge तक… सुनिए राहुल गांधी जी कितना पढ़े हैं?
पूरा इंटरव्यू देखने के लिए नीचे दिए लिंक पर क्लिक करें: https://t.co/K5JKixgj7D pic.twitter.com/LeRVxtq7yR
— Congress (@INCIndia) January 23, 2023
भारत जोडो यात्रेदरम्यान खुद्द राहुल गांधी यांनी कामिया जेनीशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत मोकळेपणाने बोलले. राहुलने सांगितले की, ‘सुरुवातीचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्यानंतर त्यानी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये एक वर्ष इतिहासाचा अभ्यास केला. मात्र, वडील राहुल गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दिल्लीत शिक्षण सुरू ठेवता आले नाही.’ शिक्षणाबाबत त्यांनी सविस्तर सांगितले.
शिक्षणाबाबत सांगताना राहुल गांधी म्हणाले,’मी एका वर्षासाठी सेंट स्टिफनला होतो. तिथे मी इतिहास शिकलो. त्यानंतर मी हार्वर्ड विद्यापीठात गेलो. तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. पण त्यादरम्यान बाबांचं निधन झालं आणि मला तिथून परत यावं लागलं. कारण तिथे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता”, अशी माहिती राहुल गांधींनी या मुलाखतीमध्ये दिली.
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातून (इंग्लंड) विकास अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दरम्यान , ती अर्थशास्त्रातील एमफिल पदवी होती. मी शाळेत असताना काही शिक्षक खूप चांगले होते, तर काही नव्हते, असेही राहुल गांधींनी संभाषणात सांगितले. राहुल गांधी यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट कोलंबस शाळेत आणि काही काळ डेहराडूनच्या दून शाळेत झाले.