इंदापूरचा निकाल अनपेक्षित – पाटील

रेडा – इंदापूर विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल अतिशय अनपेक्षित असा आहे. या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत 1 लाख 11 हजार 850 मतदारांनी माझ्यावर विश्‍वास दाखविला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 17 हजार 623 मते अधिक मिळालेली आहेत. तरीही निवडणुकीत अल्पमतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागत आहे. निवडणुकांमध्ये मतदार हे इतर घटकांचाही विचार करतात हे लोकशाहीमध्ये चांगले नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.