Harshwardhan Patil । राज्यात विधानसभा निवडणुकांची तोंडावर भाजपला मोठा धक्का देत हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर तुतारी हाती घेतली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. इंदापुरात धुमधडाक्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. हर्षवर्धन पाटील यांची इंदापुरात मोठी ताकद आहेत. त्यांनी अचानक साथ सोडल्याने भाजपला मोठं खिंडार पडले आहे.
अंकिता पाटील अन् मुलाचाही शरद पवार गटात प्रवेश Harshwardhan Patil ।
हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभेची निवडणूक तुतारी चिन्हावर लढवणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आनंदाचं वातावरण आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांच्या कन्या अंकिता पाटील आणि मुलाने देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, या दोन दिग्गज नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शरद पवार गटात आनंदाचे वातावरण आहे.
हा जनतेचा उठाव Harshwardhan Patil ।
दरम्यान, पक्ष प्रवेश करण्याअगोदर हर्षवर्धन पाटील यांनी हा जनतेचा उठाव असल्याचे म्हणत आपण कार्यकर्त्यांच्या इच्छेने शरद पवार गटात प्रवेश करत असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच राजकारणात असं पहिल्यांदा घडत असून लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.