रेडा -भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिराच्या कलशारोहण समारंभास शुक्रवारी (दि. 27) भेट दिली. यावेळी पाटील यांनी कलशाची पूजा करून दर्शन घेतले. तसेच त्यांनी लक्ष्मी-नृसिहांचे दर्शन घेऊन दमदार पावसासाठी साकडे घातले.
श्रीलक्ष्मी-नृसिंह मंदिर हे दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष्मी-नृसिंह विकास आराखड्यास मोठा निधी दिला. त्यामुळे येथील विकास कामे पूर्णत्वास आली आहेत.
तसेच फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला असून, कलशारोहणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी लक्ष्मी-नृसिंह देवस्थानच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीत त्यांनी लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा करुन देवस्थानच्या विकासाबाबत चर्चा केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मयूरसिंह पाटील, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, हरिभाऊ घोगरे, संजय बोडके, बाळासाहेब मोहिते, नाथाजी मोहिते, शरद जगदाळे पाटील, सरपंच चंद्रकांत सरवदे, उपसरपंच विठ्ठल देशमुख,
अण्णा काळे, हनुमंत काळे, विलास ताटे देशमुख, संतोष मोरे, किशोर मोहिते, पप्पू गोसावी, बापू जगदाळे, तानाजी जगदाळे, सचिन कदम, अनंत काळे, राजाराम ढवळे, विजय सरवदे, शहाजी पावशे, प्रकाश काळे उपस्थित होते.