रेडा- इंदापूर विधानसभा मतदारंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील गुरुवारी (दि. 3) आपला उमेदवारी अर्ज विधानसभेसाठी भरणार आहे. भाजपने उमेदवारांच्या पहिल्या यादीत हर्षवर्धन पाटील यांना स्थान दिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, बारामती, पुरंदर, दौंड या तालुक्यावर भाजपने विशेष लक्ष पुरवले असल्यामुळे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.