रेडा- कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आकिवाट (ता. शिरोळ) येथे इंदापूर तालुक्यातील 200 ते 250 कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. दरम्यान, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. पाटील यांनी आकिवाट हे गाव दत्तक घेतले आहे. पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांची बैठकीत . पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांना कपडे, ब्लॅकेट, वह्या वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच विशाल चौंगुले, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, ऍड. कृष्णाजी यादव, लालासाहेब पवार, नगराध्यक्षा अंकिता शहा, देवराज जाधव, मुकुंद शहा, कांतिलाल झगडे, भरत शहा, रघुनाथ राऊत, आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे, गणेश महाजन, रमेश धोत्रे, शशिकांत शेंडे, फिरोज पठाण, शिवराज कोरटकर, नीरा भीमाचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, कर्मयोगी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
- अन् ग्रामस्थ भारावले.
कोल्हापूर जिल्ह्याचे सलग 10 वर्षे पालकमंत्री असलेले ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पाटील यांनी अकिवाट गावाला भेट दिल्याने ग्रामस्थ भारावून गेले होते. अनेक ग्रामस्थांनी पाटील यांना भेटून केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.