हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी…

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

मुंबई : कन्नड विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी घरवापसी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील कृष्णकुंजवर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

मनसेमध्ये आज मेगाभरती झाली आहे. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जवळचे सहकारी आणि शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी देखील मनसेत प्रवेश केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.