दक्षिण आफ्रिकेच्या हॅरिसचे क्रिकेट शिबिर

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू पॉल हॅरिसच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा रविवारपासून औरंगाबादमध्ये प्रारंभ झाला. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक उदयोन्मुख क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे.

राजेंद्र एंटरप्राइजेसतर्फे पॉल हॅरिसचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल परिसरात हे शिबिर चार दिवस चालणार आहे. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे.

देशातील युवा खेळाडूंना या शिबिरातून लाभ होणार असून येत्या काळात असेच आणखी काही खेळाडू भारतात शिबिरे आयोजित करण्यासाठी इच्छुक आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा हॅरिसच नव्हे तर अनेक देशांचे माजी खेळाडू भारतात आकादमी सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.