Harnath Singh Yadav on Salman Khan । अजित पवार गटाचे नेते बाब सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. याप्रकरणामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सलमान खानशी जवळीक असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचेही एकीकडे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागा, असा सल्ला दिलाय.
बिश्नोई समाजाची माफी मागा Harnath Singh Yadav on Salman Khan ।
भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी लिहिले आहे की,”बिश्नोई समाज काळविटाला देव मानतो आणि त्यांची पूजा करतो आणि तुम्ही त्यांची शिकार केली, त्यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी पुढे लिहिलं आहे की, बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करत आपल्या मोठ्या चुकांबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागितली पाहिजे.” असे त्यांनी म्हटले आहे.
प्रिय @BeingSalmanKhan (सलमान खान )
काला हिरण जिसे बिश्नोई समाज देवता मानता है उसकी पूजा करता है, उसका आपने शिकार किया और उसे पका कर खा लिया।जिसके कारण बिश्नोई समाज की भावनाएं आहत हुई और आपके प्रति बिश्नोई समाज में लंबे समय से आक्रोश है।
व्यक्ति से गलती हो जाती है। आप बड़े… pic.twitter.com/1ywkry99Rq
— हरनाथ सिंह यादव (@harnathsinghmp) October 13, 2024
सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त Harnath Singh Yadav on Salman Khan ।
बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात मोठा वावर असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरून गेला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईनं अनेकदा सलमान खान निशाण्यावर असल्याची कबुलीदेखील दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईनं त्यांच्या निशाण्यावर सलमान खान असल्याचं NIA समोर कबुल केलं होतं. 1998 मध्ये सलमान खाननं एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जोधपूरमध्ये काळविटाची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो. पूज्यस्थानी असलेल्या काळविटाची शिकार
केल्यामुळे सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे.
हेही वाचा
बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशानही होता टार्गेटवर; एक फोन आला अन्…